काळवीटचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी ः- नेरी – सातोना मार्गावरील रेल्वे फाटकाच्या शेजारी एका अज्ञात चार चाकी गाडीने काळवीटला धडक दिली. त्यात काळवीटचा जागीच मृत्यू झाला. नेरी रेल्वे फटका जवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास काळवीट रस्ता ओलांडत असताना एका वाहनाने जोरदार धडक दिली. काळवीटच्या डोक्याला व मागच्या पायाला दुखापत झाली. त्यात काळवीटीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांना करण्यात आली. त्यांनी वनपरिक्षेत्र कांद्रीच्या बीटरक्षक मनीषा रामटेके, आंधळगावचे क्षेत्र सहाय्यक एस. के. वैद्य घटनास्थळावर पोहोचले. घटनास्थळावरच सातोना येथील पशुवैद्यकीय अधिकारी कापगते यांनी मृत झालेल्या काळवीटचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर जवळील शेतामध्ये काळवीटला मातीमध्ये पुरून अंत्यविधी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *