चौथ्या वर्गातील मुलींशी शिक्षकाने केले अश्लील चाळे

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी ः- तालुक्यातील वडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या मनोविकृत शिक्षकाने शाळेतील पाच मुलीशी मागील वर्षांपासून मोबाईल वर अश्लील सिनेमा दाखवून सिनेमात असल्या प्रमाणेच अश्लील चाळे करीत असल्याचे मुलींनी खिचडी बनविणाऱ्या स्वैपाकिन काकुला सांगितल्यामुळे सदर च्या घटनेची माहिती मुलींच्या पालकांना व गावकऱ्यांना माहीत झाल्यामुळे गावकऱ्यांनी मनोविकृत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला.

मनोविकृत शिक्षकाचे नाव अनिल जगन राऊत (५४) असे नाव असून लाखांदूर येथील साईनाथ वसाहतीत वास्तव्यास असून पवनी तालुक्यातील वडेगावया गावी असलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी ला कार्यरत आहे. सदर शिक्षक वडेगावयेथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यापासूनच तिसऱ्या-चौथ्या वर्गातील मुलीशी अश्लील चाळे करीत असे आणि मुलींना घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. भीतीपोटी आजतागत मुलींनी सदर बाब आई वडिलांना सांगितले नाही. मात्र सोमवार दिनांक ९ मार्चला चिमुकल्यांना मनोविकृत तसेच अश्लील सिनेमे पाहून पिसाट झालेल्या शिक्षकाचा त्रास सहन न झाल्याने शाळेतील खिचडी शिकविणाऱ्या स्वयंपाकिन काकुला घडलेला प्रकार सांगितला.

खिचडी शिकविणाऱ्या स्वयंपाकिन काकुने घडलेला घृणास्पद प्रकार चिमुकल्यानच्या आई वडिलांना सांगितला. सदर प्रकार ऐकून सुन्न झालेल्या आई वडिलांनी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन लगेच पोलिसपाटील यांच्या निदर्शनास सदर प्रकरण आणून दिला. गावकऱ्यांनी व पोलिसपाटलानी सकाळी (मंगळवार दि १० मार्च) शाळेत जाऊन चौकशी केली असता मनोविकृत शिक्षकाने पळवापळवी केल्याने गावातील नागरीकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

पोलीस पाटील यांनी लागलीच पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगताचक्षणाचाही विलंब न करता पोलीस घटनास्थळी येऊन आरोपी मनोविकृत शिक्षकाला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आहे. असून आरोपीला अटक करून शिक्षकाविरद्ध बालकाचे लैंगिक अपराधपासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी समस्त जनतेनी केली. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडांम, पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक यशोदा पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *