विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग विचारण्यासाठी विद्यार्थ्याने ‘एआय’ला काय करायचे असे विचारले असता’एआय’ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र आपणचूक कबूल केली तर बाबा मारतील जब भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले. मात्र या प्रकारामुळे मोबाईलचा अतिवापर आणि विद्यार्थ्यांचा एकलकोंडेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.







