खरबी येथे जुगार अड्ड्यावर धाड; ९ आरोपिंना गुन्हा दाखल
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शेतातील पांदन रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून जवाहरनगर पोलिसांनी ९ आरोपिंना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ४४ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींत अधिन मनसजन थोटे (वय २६) रा. खरबी, मनिष गुलाब गौरखेडे (वय २८) रा. खराडी, स्वरूप हर्षल मेश्राम (वय ३०) रा. खरबी, रोहित प्रभाकर लाडे (वय २६) रा. महादुला, ता. मौदा, आकाश श्रीधर बावनकर (वय २८) रा. मौदा, पंढरी नामदेव हटवार (वय ४५)रा. खरबी, पांडुरंग गोपीचंद आकरे (वय ३७) रा. खरबी, फरार आरोपी आशिष पिरम निहेपुंजे (वय वय ३२) रा. खरची व आकाश पैदाम (वय ३०) रा. खरबी यांचा समावेश आहे.
जवाहरनगर पोलिस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा यांना खरबी येथील घाटोळे यांचे शेतालगत असलेल्या पांदन रस्त्यावर जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी ताफ्यासह धाड घातली. त्यांच्या ताब्यातून फळावर मिळालेले पैसे, सहा मोबाईल व दुचाकी होंडा शाईन क्र. एमएच ४० सीआर ३१२८, होंडा स्प्लेंडर प्लस क्र. एमएच ४० बीक्यू ५०७९, सि. बी. झेड क्र. एमएच ३६ आर ८९०२, टिव्हीएस क्र. एमएच ३१ टीसी डी ००२, हांेडा स्प्लेंडर क्र. एमएच ३६ एके ९७२६ असे मिळून एकूण ४ लाख ४४ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे कलम १२ (अ) महा. जुगार कायदा अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पो.नि. पाटील यांच्या मार्गदर्शनात पो. उपनि. दुधकावरा यांनी केली.







