स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा कडुन अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्या दोन आयसर वाहनावर कारवाई
आयसर क्र. एमएच ४० सिटी ५४४५ चा चालक आरोपी नामे (१) मोहम्मद नवेद नौशाद कुरेशी, वय २२ वर्ष, रा. पानखाना बगीचा भाजीमंडी, कामठी, जिल्हा नागपुर व २) वाहन मालक आरोपी नामे तन्वीर रशीद कुरेशी रा. येरखेडा रोड कामठी तसेच आयसर क्र. एमएच ४० सिटी ४४२५ चा चालक नामे ३) जफर ईकब्बाल शेख इस्माइल शेख वय ५२ वर्षे कुरेशी रा. पानखाना बगीचा भाजीमंडी, कामठी, जिल्हा नागपुर व वाहन मालक आरोपी नामे ४) फिफरोज रशीद कुरेशी रा. येरखेडा रोड कामठी, नागपूर यांनी आयसर क्र. एमएच ४० सिटी ५४४५ व आयसर क्र. एमएच ४० सिटी ४४२५ मध्ये प्रत्येकी १३ व १२ असे एकुन २५ गोवंश जातीच्या जनावरांना क्रूरतेने कोंबुन भरुन अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन एकुण किं. ३२,५६,६००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सर्व आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. १४३/२०२५ कलम ११ (१), (ङ), (ज), (झ) प्राण्यांचा छळ प्रतीबंधक अधिनियम १९६०, सह कलम ५ (अ), ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६, सह कलम ४९ भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस स्टेशन भंडारा चे अधिकारी करीत आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा. व अपर पोलीस अधीक्षक, श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पो. नि. नितीन चिंचोळकर, स. पो. नि. शिरीष भालेराव सोबत. पो.हवा. दोनोडे, पो. हवा. कठाणे, पो. शि. पेठे, पो. शि. ठाकरे, पो. शि. शहारे, चालक पो. शि. गजभिये यांनी केली.