खा. डॉ. पडोळे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाळणी
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- तहसील कार्यालय मोहाडी येथील सभागृहात घेतला जनतेच्या हितासाठी आढावा खा. डॉ. प्रशांत पडोळे कामचुकार अधिकारी दिसून आले त्यांना स्पष्ट निर्देश दिले. तहसील कार्यालय मोहाडी येथे आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्यात आला. खा. प्रशांत पडोळे यांनी जनतेच्या बऱ्याच समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. पट्टे, घरकुल, रेती, पाणी, विद्युत, वनविभाग, भूमिअभिलेख, बावथळी, तहसील संबधी बऱ्याच समस्या समोर आणल्या.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बावनथळीचे पाणी पोहचत नाही, खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसून जर ज्यांना मिळाले त्या घरकुल च्या नावाखाली रेती विकली जाते. भूमिअभिलेख अधिकारी जनतेला सहकार्य करत नाही. त्यांच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त असून त्यांचे जनतेनी दिलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष दिसून येते, असेही ते म्हणाले. कामचुकार अधिकारी यांना आढावा बैठक दरम्यान स्पष्ट निर्देश दिले.यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. प्रशांत पडोळे, देवेंद्र इलमे जि. प. सदस्य, आशिष पात्रे, विजय शहारे शहर अध्यक्ष, राजेश हटवार ता. अध्यक्ष, राजेश निबार्ते, आकाश बोंद्रे, उपविभागीय अधिकारी तुमसर, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक इतरही विभागाचे ता. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मोहाडी शहर आणि ग्रामीण चे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









