राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ःशेतकऱ्यांचे धान खरेदीसाठी लिमिट वाढविणे, धान विक्रीचे चुकारे देणे, शेतकऱ्यांना बोनस देणे यासाठी राज्य सरकार उदासिन आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज दि. २६ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला. आ. चरण वाघमारे पुढे म्हणाले, धान खरेदीची लिमिट न वाढविल्यामुळे धान खरेदी बंद झाली आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून आहे. धान खरेदीपासून शेतकरी वंचित झाले आहेत. ३१ मार्च ही पिक कर्ज भरण्याची शेवटची तारीख असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे धान खरेदी करण्यात आले नाही. यामुळे त्यांनी पिक कर्ज कसे भरावे, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये दि. १५ फेब्रुवारी रोजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन मोटघरे यांना गोबरवाही पोलिसांनी बेदम मारहाण केली. तंटामुक्तीचे अध्यक्ष असतांना पोलिसांनी त्यांची विचारपूस करायला हवी होती. मात्र तसे न करता पोलिसांनी त्यांना संशयीत आरोची समजून उचलून गोरबवाही पोलीस स्टेशनमध्ये नेले. व त्यांनाच बेदम मारहाण केले. ही पोलिसांची दादागिरी असल्याचेही चरण वाघमारे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *