पिक अप वाहनातून रानडुकराची शिकार, १२ आरोपींना अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पिक अप बोलेरो वाहनातून रानडुकराची वाहतुक करतांना तालुक्यातील झंझेरीया बिटातील वाघसांध्या तलावाजवळ तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून पिकअप वाहनासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल गणाजी रहांगडाले, वनरक्षक दिपक भिवगडे, कु. के. ए. मांढरे हे दि. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता शासकीय वाहन क्रमांक एमएच ३६ के १८१ ने गस्ती करण्याकरीता निघाले.

गस्ती करीत असतांना झंझेरीया बिटातील वाघसांध्या तलाव परिसरात गेले असता कक्ष क्रमांक ७४ अ राखीव वनातील लागुन असलेल्या तलावाजवळ एक वाहन पिक अप बेलेरो क्र. एमएच ४९ बीझेड आढळुन आले. त्यामध्ये एक जंगली रानडुक्कर होते तसेच आजुबाजुला १० जे १२ लोक आढळुन आले. त्यांना अधिकाऱ्यांनी विचारपुस करुन चौकशी केली असता त्यांनी जंगलात व शेतात क्षेत्रात जावुन जंगली रानडुक्कर पकडण्याचे कामे करतो आणि पकडलेले रानडुक्कर नागपुरला कधी छत्तीसगढ मध्ये विकले असे सांगीतले.

त्यांचेवर भा.व.अ. १९२७ चे कलम २६ (१) (आय) आणि वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ सुधारीत २०२३ चे कलम ९,४८३,४९, ५० व ५१ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असुन, सर्व आरोपींना कार्टात हजर केले. त्यांचे जवळुन हत्तीमार जाळे १३ नग, एक लोखंडी कुऱ्हाड, एक सुरा, बांबु काठी ४० नग, केबल १० नग, ॲड्राईड मोबाइल १२ नग आणि महेद्र कंपणीचा बोलेरो पिक अप वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास उपवनसंरक्षक योंगेद्र, गडेगावचे प. नि. अ. तथा स. व. सं. तुमसर रितेश भोंगाडे यांचे मार्गदर्शनात तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले, क्षेत्र सहाय्यक आर. डी. पाल्हेवार, झंझेरीयाचे बिटरक्षक के. ए. मांढरे व अधिनिस्त कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *