पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केली पोलीस भरतीची पाहणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेचा आज तिसरा दिवस होता. या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आज पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस मुख्यालय, भंडारा येथील कवायत मैदानाला भेट देऊन सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधला आणि राबवल्या जाणाऱ्या पारदर्शक प्रक्रियेचा आढावा घेतला. भरती प्रक्रियेत वापरण्यात येत असलेले उमेदवारांशी चर्चा करतांना पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आधुनिक तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक पद्धती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि पारदर्शक कामकाजाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि संपूर्ण भंडारा पोलीस दलाचे विशेष कौतुक केले. भरती प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी एकूण १,००१ उमेदवारांना चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५८३ उमेदवारांनी हजेरी लावली. आलेल्या उमेदवारांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप करण्यात आले, ज्यामध्ये १५९ उमेदवार अपात्र ठरले. उर्वरित सर्व निकष पूर्ण करणाऱ्या ३८८ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी देऊन आपली शारीरिक क्षमता सिद्ध केली. भंडारा पोलीस प्रशासनामार्फत ही निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर आधारित राबवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *