बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी,देवपायली  येथील घटना : यापरिसरात पुन्हा बिबट्याचा….

 गोंदियाः- जिल्ह्यातील सडक अजर्ुनी तालुक्यात अंगणात काम करीत असलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील देवपायली येथे घडली. यमुना तेजराम गोबाडे (वय ६०) रा. देवपायली असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तिच्यावर सध्या सडक अजर्ुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सडक अजर्ुनी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून दोन वाघ आणि बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी वन्यजीव विभागाने वाघिणीला जेरबंद केले. यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, त्यानंतर देवपायली परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास अंगणात काम करीत असलेल्या यमुना गोबाडे या वृद्धेवर बिबट्याने मागेहून हल्ला करून जखमी केले. दरम्यान, शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला. मात्र, यात यमुना गोबाडे ही वृद्धा जखमी झाल्याने तिला त्वरित सडक अजर्ुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. या घटनेमुळे देवपायली व परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील देवपायली गावातसाडेसात वाजता बिबट्याने यमुना गोबाडे या वृद्ध महिलेवर हल्ला करून जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *