भारतीय पोवार संघ भंडाराच्या अध्यक्षपदी मयुर बिसेन, सचिवपदी विजय पारधी तर कोषाध्यक्षपदी गणेश पारधी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भारतीय पोवार संघ भंडाराच्यावतीने चक्रवर्ती सम्राट राजाभोज जन्मोत्सव समारंभ किसनलाल बांगडकर सभागृह, शुक्रवारी भंडारा येथे साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांची अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मयुर बिसेन यांची फेरनियुक्ती करण्यात आली. तर सचिवपदी विजय एच. पारधी व कोषाध्यक्षपदी गणेश एन. पारधी यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांचे पोवर समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पोवार समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले.









