आष्टी जंगल शिवारात कोंबडा जुगारावर धाड
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर तालुक्यातील आष्टी ते लोभी जंगल शिवारात सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर धाड घालून गोबरवाही पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ लाख ३८ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीत अरविंद गणाजी पुष्पतोडे (वय ४५) रा. आष्टी, यशपाल मिताराम गौपाले (वय ४२) रा. कुरमुडा, उमेश मैनाजी बोरकर (वय ४०) रा. कवलेवाडा, वैभव मुन्ना झोडे (वय २०) रा. नाकाडोंगरी, राहुल गणेश गौपाले (वय २३) रा. आष्टी, कोमल महादेव सोनवाने (वय २०) रा. लोभी,देवानंद द्वारपाल पुष्पतोडे (वय २७ वर्ष) रा. आष्टी, राखीचंद मोतीराम बागळे (वय ३०) रा. आष्टी, प्रेमलाल तानू लाळे (वय ४०) रा. आष्टी, अजय चेतन डोंगरवार (वय ३२) रा. आष्टी, अक्षय राजु मानकर (वय ३०) रा. नाकाडोंगरी, गोपालदास चिरकुट सोनवाने (वय ४८) रा. आष्टी, जितेंद्र ब्रिजलाल मेश्राम (वय २९) रा. बोनकट्टा म.प्र., नितेंद्र सोहनलाल राउत (वय २२) रा. सिवनहेटी म.प्र. व लालचंद डोकुलाल खोडपे (वय ४९) रा. दिगधा म. प्र. यांचा समावेश आहे. गोबरवाही पोलीस स्टॉफसह परिसरात पेट्रोलिंग करत असतांना आष्टी ते लोभी जंगल शिवारात काही ईसम खुल्याजागेत केंबड्यांची झंुज लावुन त्यावर पैसे लावून हार जितचा खेळ असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून त्यांनी तेथे पंचासमक्ष धाड घातली असता त्यांना कोंबडा बाजार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या अंगझडतीतून तसेच घटनास्थळी मिळालेल्या मोटारसायकल असा एकूण ७ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपिंवर पोलीस स्टेशन गोबरवाही येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राघोर्ते, खोब्रागडे, कडव यांनी केली.









