७ फेब्रुवारीला माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली/भंडारा :- नवनिर्मित “मिनी दिक्षाभुमी’च्या बाराव्या वर्धापन दिन तथा माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे भव्य आयोजन सिल्ली येथे गुरुवार दि. ५ फेब्रुवारी पासून ते रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सिल्ली येथील बौध्द विहार परिसरात करण्यात आले आहे. यानिमित्ताने सिल्ली येथे मिनीदिक्षाभुमीच्या चतुर्थ वर्धापनदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. सिल्ली येथील नवनिर्मित “मिनी दिक्षाभुमी’ ही भंडारा जिल्हा व आजुबाजुच्या परिसरातील अत्यंत आकर्षक व रमणीय वास्तू असून संपुर्ण विदर्भातील कानाकोपक्तयातून पर्यटक या “मिनी दिक्षाभुमी’ ला भेट देऊन वंदन करतात.

या “मिनी दिक्षाभुमी’चे वैशिष्टये म्हणजे अत्यंत कमी जागेत नियोजनपुर्वक व लोकवर्गणी तसेच श्रमदानातून नागपूरच्या दिक्षाभुमीची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आली. सिल्ली येथील बौध्द बांधवांच्या एकजुटीचे प्रतिक असल्याचे येथे येणाक्तयापर्यटकांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत असून या “मिनी दिक्षाभुमी’ च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दि. ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या चार दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सदर “मिनी दिक्षाभुमी’ चा वर्धापन दिन तसेच माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.

गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजीत कार्यक्रमात मिनीदिक्षाभुमीच्या बाराव्या वर्धापन दिन सोहळयाचे उद्घाटन पं. स. भंडाराचे विस्तार अधिकारी प्रमोद तिडके यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी पं. स. भंडाराचे गटविकास अधिकारी प्रमोद हुमणे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सिल्लीचे सरपंच सौ. सुचिता पडोळे, ग्रामविकास अधिकारी शितल मोहनकर, तंमुस अध्यक्ष नरेंद्र लकडे, पो. पा. रमेश चोपकर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक किरण मेश्राम, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी जयपाल सुखदेवे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी तेजराम मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनोद तिडके, ईश्वर राईस मिलचे मालक संतोष वंजारी, विठ्ठल राईस मिलचे मालक सुभाष फुलबांधे, ॲड. सुधिर मेश्राम, कार्तिकस्वामी मेश्राम, सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक उत्तम मेश्राम व बुध्दविहार समितीचे अध्यक्ष रंजित हुमणे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

याच दिवशी रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ वाजता आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी नृत्य सादर करणार आहेत. शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माई रमाई जन्मोत्सव सोहळयानिमित्त विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे उद्घाटन डॉ. प्रा. जयश्री सातोकर यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता दरम्यान होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के, तर मुख्यवक्ते प्रा. डॉ. नागेश गवळी अहिल्यानगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विशेष अतिथि म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक संदीप गजभिये, उपशिक्षणाधिकारी राहुल बावा, प्रा. डॉ. क्रिष्णा पासवान/मेश्राम तर प्रमुख अथिती म्हणून जि. प. सदस्या अनिता भुरे, पं. स. सदस्य प्रशांत खोब्रागडे, सरपंच सुचिता पडोळे, विनोद विद्याालयाचे माजी प्राचार्य अनमोल देशपांडे, विनोद विद्यालयाचे प्राचार्य दादाराव मस्के, प्रा. दिगांबर रामटेके, सामाजिक कार्यकर्ता मनिष वासनिक, सिल्ली येथील जेष्ठ महिला कांताबाई चव्हाण, जेष्ठ नागरिक प्रकाश हुमणे व बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष रंजित हुमणे आदीं उपस्थित राहणार आहेत.

तसेच रात्रीला ८.३० वाजेपासून महाराष्ट्राचे सुप्रसिध्द समाज प्रबोधनकार, शिवव्याख्याते ह. भ. प. प्रा.निलेश महाराज कोरडे, पुणे यांचे समाजप्रबोधनपर जाहिर किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी रविवार दि. ८ फेबु्रवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ते रात्री ९ वाजतापर्यंत समाज बांधवांच्या सहकार्याने तसेच बौध्द समिती सिल्ली यांच्या वतीने भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी आयोजीत कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आर्वजुन उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमाचा लाभा घ्यावा, असे आवाहन बौध्द विहार समितीचे अध्यक्ष रंजित हुमणे, सचिव राजेश मेश्राम, उपाध्यक्ष प्रमोद बन्सोड, सहसचिव जागेश्वर बडगे, सदस्य विवेक गजभिये, लोकेश मेश्राम, सुहास गजभिये, सदिप मेश्राम, संदिप गजभिये, शैलेश मेश्राम, गौतम मेश्राम, दिपक मेश्राम व पत्रकार उल्हास तिरपुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *