तुमसरमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्र. 1) दिपक सेवकराम उईके (वय 35 वर्ष, रा. संत जगनाडे नगर, तुमसर) याच्याकडून 7,775 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सट्टापट्टी लेखनाचे काम आरोपी क्र. 2) मनोहर श्रीराम तरारे (रा. शास्त्री वार्ड, तिरोडा) याच्या सांगण्यावरून 10% कमिशनवर करत असल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे तुमसर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) तसेच भादंवि कलम 49 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पी.बी. गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. पंचबुधे यांनी केली. यासोबत पो.हवा. धर्मेंद्र भोंडेकर, पो.शि. चंदन चकोले, उमेश सार्वे, रविकुमार आडे यांनी सहकार्य केले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध सट्टापट्टी व्यवसायांना चाप लागण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे.