“लाडकी बहीण’ चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल

सांगलीः- लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणार अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालेलेच नाही. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची शासनाकडे पाच कोटी ६० लाख रुपये सरकारकडे बाकी आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान मिळते, म्हणून या योजनेत सहभाग घेतला होता. शेतीत ठिबक योजनेसाठी स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांनी पैसे घातल. सरकारकडू न मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे मागण्यासाठी शेतकरी कृषी कार्यांलयाचे उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांना त्यांच्या हक्काचे सबसिडीचे पैसे मिळत नसल्याची स्थितीउद्भवली आहे.

लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका बसत असल्याने विरोधकांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन सारख्या योजना बंद करायला लागल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. तर लाडकी बहीण योजना बहिणींसाठी नाही तर सत्तेसाठी होती, असे म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांच्या नावाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *