मोहाडीत महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी , नगरपंचायत कार्यालय मोहाडी व एन.जे.पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहाडी येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील ६५ गावात आज पासुन तिन एप्रील पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छ्ता अभियानाची सुरुवात बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन येथून करण्यात आली. त्यानंतर शहरात स्वच्छता करण्यात आली.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांच्या हितासाठी कार्य केलेत, मानव सेवा केली, स्वच्छता व व्यसनमुक्ती साठी प्रयत्न केले. त्यांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमावर चालून सेवकांनी आपले जीवन सफल करावे, निधी व सहकार्य या मंडळाच्या विकास कामासाठी सदैव असेल, असे मार्गदर्शन जि. प. सभापती नरेश ईश्वरकर यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा छाया डेकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बहुउद्देशीय परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या अध्यक्षा लता बुरडे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंत ढबाले, नगरसेविका रेखा हेडाऊ नगरसेविका वंदना पराते, नगरसेविका देवश्री शहारे, नगरसेवक महेश निमजे, नगरसेविका सुमन मेहर, प्रा. नरेश आंबीलकर, डॉ. विजया राऊत, प्रा. गणेश वानखेडे, विनोद तांडेकर, रवि शेंडे, शेषराव ठवकर, भगवान कातोरे, प्रा. अनिल चकोले, दुर्गा मेहर, माजी संचालक राजू माटे, नत्थु कोहाड, एकनाथ जीभकाटे, उमेश मोहतूरे, सुनिल मेश्राम, यशवंत थोटे, सिराज शेख, संचालक शालू निंबार्ते, सचिव युवराज गलबले, विजय निमकर, कोषाध्यक्ष राकेश लिल्हारे, उपाध्यक्ष देवचंद सेलोकर, अशोक बोंदरे, हितेश ढोबळे ईत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहाडी मंडळाचे माजी सचिव मोरेश्वर सार्वे यांनी केले तर आभार राकेश लील्हारे यांनी मानले. व्यवस्थापक भगवान पिलारे , लक्ष्मण माहुले, आकाश ठवकर व बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे सर्व सेवकगण व परिसरातून आलेले सेवक सेविका यांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान मोहाडी मध्ये यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *