“समर्पणाचा शतकोत्सव’ विशेषांकाचे प्रकाशन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मासिक जागरण पत्रिका विदर्भ हुंकर द्वारा तयार केलेल्या “समर्पणाचा शतकोत्सव’ या विशेषांकाचे प्रकाशन भंडारा येथे २१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भंडारा कार्यालयात जिल्हा कार्यकारिणी बैठक तसेच वक्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य दत्ताजी केळकर, भंडारा विभाग कार्यवाह राजेंद्र दोनाडकर, जिल्हा संघचालक संजय काळे, विभाग प्रचार प्रमुख शरद गिरी, जिल्हा प्रचार प्रमुख अमित गिऱ्हेपुंजे यांच्या हस्ते समर्पणाचा शतकोत्सव या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकातून अमित गिऱ्हेपुंजे यांनी या पुस्तकाच्या विशेषत्वाची माहिती दिली. यावेळी विशेषांकातील लेखक दत्ताजी केळकर यांनी सदर पुस्तकाचे महत्व, त्याची उपयोगिता आणि प्रकाशनाच्या उद्देश पटवून दिला. कार्यक्रमाला सर्व शाखांचे कार्यवाह, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विविध आयामांचे घटक, वस्तीप्रमुख व मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती.









