रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

चालकास त्याचे वाहणात असलेल्या मालाबाबत विचारणा केली असता त्याने रेती असल्याचे सांगीतले. वाहनात अंदाजे १ ब्रास रेती अंदाजे किंमत २ हजार व ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत ५ लाख रुपये मिळून आला. रेती वाहतुकीचा पास परवाणा विचारले असता त्याने नसल्याचे सांगुन दाखविले नाही. वेळीच सदर टॅक्टर वेळीच ताब्यात घेवुन घटणास्थळ पंचणामा तसेच जप्ती पंचणामा तयार करण्यात आले. टॅक्टर चालक विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय कसोधन व पो. हवा इळपाते यांनी केली.