खिदमत संस्थेच्या माध्यमातून १० नव दाम्पत्य विवाह बंधनात

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :-आजची लग्न पध्दती मोठी खर्चिक झाली आहे. सामान्य कुटूंबातील नागरिकांना मुलामुलींना शिक्षण शिकविणे, पालनपोषण करणे कठीण झाले आहे. तसेच मुला-मुलींचे लग्न करणे अवघड होत आहे. आजच्या खर्चिक लग्न परंपरेतुन सामान्य नागरिकांना दिलासा देवुन लग्नबंधन हे सुलभ होण्यासाठी खिदमत सोशल वेलफेअर संस्था भंडारा च्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सामाजिक दायीत्व स्विकारून गरजु बांधवांच्या मुला-मुलींचे विवाह लावून देत आहे. हे विशेष. यावर्षी खिदमत संस्थेच्या माध्यमातून १० नव दाम्पत्य विवाह बंधनात अडकले आहेत. खिदमत संस्थेची सदैव प्रगती होण्यासाठी अनेक नागरिकांचे आशीर्वाद त्यांच्या कार्याला बळ देत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले. ते खिदमत सोशल वेलफेअर संस्था भंडारा च्या वतीने भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकयेथील हाजी सलाम क्रीडा संकुलनात आयोजित मुस्लिम वर – वधुच्या सामुहिक विवाह सोहळ्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते होते.

त्यावेळी खिदमत सोशल वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष असरार शेख, हाजी शोबिर अली, इकबाल कनोजे, राजु सलाम पटेल, रिजवान हसन, समीर नवाज, इकबाल खान, जहिर अन्सारी, इमरान हुसैन, नईम शेख, इरफान कुरेशी, अफसान बेग, रफिक भाई, जफर शेख, ताहीर बेग, अकील खान व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी खिदमत सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला खिदमत सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीने आरमारी, सोफा, कुलर, दिवान, फ्रिज, सुटकेश तसेच जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्यात. विवाह सोहळ्याला आलेल्या वधू – वर यांच्याकडील पाहुण्यांना संस्थेच्या वतीने सकाळ व सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यात जवळपास १० हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा शहरातील नामांकित जनसेवक स्वर्गवासी प्राध्यापक रफिक शेख यांनी सुरू केली होती. त्यांच्या कार्याला सदैव सलाम. भविष्यात अशाप्रकारे सामाजिक जिम्मेदारीचे कार्य अविरत चालू राहील असे मत आयोजकांनी व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नवाज व प्रास्ताविक खिदमत सोशल वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष असरार शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजु सलाम पटेल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता खिदमत सोशल वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष असरार शेख, हाजी शोबिर अली, इकबाल कनोजे, राजु सलाम पटेल, रिजवान हसन, समीर नवाज, इकबाल खान, जहिर अन्सारी, इमरान हुसैन, नईम शेख, इरफान कुरेशी, अफसान बेग, रफिक भाई, जफर शेख, ताहीर बेग, अकील खान इत्यादींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *