पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जिल्हा दौरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- राज्याचे गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, राज्यमंत्री तथा भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जिल्हा दौरा हे दि.१५ जानेवारी, २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

गुरूवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी १२.०० वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण करतील त्यानंतर दुपारी ०१.३० वाजता भंडारा येथे आगमन व वेळ राखीव. दुपारी ०३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बावनथडी प्रकल्पाच्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ०४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. यानंतर १६ जानेवारी,२०२६ सकाळी ०८.०० वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदियाकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *