तुमसर तालुक्यात वाघाची दहशत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर तालुक्यातील सितेपार, येरली आणि तामसवाडी परिसरात सध्या वाघाच्या वावरामुळे प्रचंड घबराट पसरली आहे. मात्र, या संकटाच्या काळात वनविभागाच्या तुमसर रेंजने शेतकऱ्यांना दिलासा देणारी कामगिरीही केली आहे. नुकत्याच संपलेल्या डिसेंबर महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बाधित झालेल्या तालुक्यातील १२९ लोकांना एकूण ७ लाख ७२ हजार ४४९ रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे.

सोमवार, १२ जानेवारी रोजी येरली शिवारात शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने सितेपारच्या दिशेने पलायन केले. शेतातील ओल्या मातीवर वाघाच्या पावलांचे स्पष्ट ठसेउमटले असून, वनविभागाने या परिसरात आपली गस्त वाढवली आहे. सितेपार आणि तामसवाडी परिसरातील शेतकऱ्यांना सध्या शेतात जाताना समूहाने जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिसेंबर महिन्यात तुमसर वनपरिक्षेत्राकडून मोठी कारवाई करण्यात आली.

वन्यप्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीसाठी आणि पशुधनावरील हल्ल्यांसाठी तालुक्यातील १२९ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ७ लाख ७२ हजार ४४९ रुपये जमा करण्यात आले आहेत. मदतीचा तपशील:मदत वाटप कालावधी: डिसेंबर महिना.एकूण लाभार्थी संख्या: १२९ शेतकरी/ ग्रामस्थ.एकूण वितरित रक्कम: ७,७२,४४९ रुपये.नुकसानीचाप्रकार: पीक नुकसान आणि वन्यप्राण्यांचे हल्ले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *