अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वतुर्ळात खळबळ
सोलापूरः- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने मोठी खेळी खेळली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली आहे.
तुषार जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ९ ड मधील राजकीय गणिते पूर्णपणेबदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती.









