शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा चॅम्पियन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा राजहंस पब्लिक स्कूल मुंबई अंधेरी येथे दि. २ ते ४ जानेवारी २०२६ ला राज्यस्तर शालेय १४ वर्षाखालील मुलींच्या सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय भंडारा संघाने गोल्ड मेडल प्राप्त करून महाराष्ट्र नंबर मान प्राप्त केला व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा करिता कु.काव्या रहांगडाले, आनिया बालपांडे, हर्षदा ढवळे यांची महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड झाली तिन्ही खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार संघातर्फे – आनिया बालपांडे, मृणाली येनोरकर, विधी कठाने, हर्षदा ढवळे, अक्षदा शेंडे, किंजल केसलकर, यशस्वी गोंधळे, अक्षदा घाटोळे, नैना देव्हारे, रूपाली येनोरकर, ख़ुशी चौधरी, कृतिका सूर्यवंशी, आरोही धोत्रे, कस्तुरी सरगे, सौम्या कदम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघाला – क्रीडा शिक्षक श्री बेनीलाल चौधरी, शुभांगी येनोरकर, अंकित भगत यांचे प्रशिक्षक लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. एडवोकेट एम. एल. भुरे, संस्थेचे सचिव शेखर बोरसे, प्राचार्य सौ. निलू तिडके, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, पर्यवेक्षिका श्रद्धा रामेकर, लता ब्राह्मणकर, रेखा पनके, मोहन दाढी, अरुण बांडेबुचे, सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव दीपक सोनटक्के जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे, क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड सर्व शिक्षक वृद्ध यादी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *