विद्यानगर भंडारा येथील वेशा व्यवसाय रॅकेटचा पर्दाफास
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्ड, विद्यानगर येथे सुरु असलेल्या वेशा व्यवसाय रॅकेटचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने पर्दाफास केला. दि. १० जानेवारी रोजीअनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भंडारा यांना संत ज्ञानेश्वर वार्ड, विद्यानगर भंडारा येथे अवैध देहव्यापर चालत असल्याची माहिती मिळाली. अनैतिक मानवी वाहतुक कक्षातील अधिकारी, अंमलदार तसेच एनडीपीएस पथक, पंच, बनावट ग्राहक तयार करून सदर गोपनिय माहीती मिळालेल्या ठिकाणी जावुन बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यावरून सदर ठिकाणी कारवाई केली.
कारवाईमध्ये आरोपी संगीता विलास धारगावे ही आपले राहते घरी पीडित महिला यांचेकडून देह व्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या ताब्यातून २०३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पो. हवा. अंकुश गाढवे, पो. ना. अंकोश पुराम, पो. शि. योगेश ढबाले, पो. शि. कौशिक गजभिये, स्थानिक गुन्हे शाखा तसेच स.पो.नि. केशव पुंजरवाड, महीला पो. हवा. अर्चना कुथे, मंजुषा घरडे, मानिक किरसान अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भंडारा यांनी केली.









