अखेर त्या 17 ही रेतीच्या टिप्पर चालक व मालकावर गुन्हा दाखल

दैनिक लोकजन वृत्तसेवाभंडारा :- जयकिसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी येथील रेतीने भरलेले १७ टिप्पर जप्त करण्यात आले होते. वरठीचे मंडळ अधिकारी महादेव इप्पर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरठी येथे त्या १७ ही टिप्परच्या मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या मालकीच्या असलेल्या जयकिसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी येथे उपविभागीय अधिकारी भंडाराचे पथक, पोलीस स्टेशन वरठीचे पथक, पोलीस स्टेशन मोहाडीचे पथक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भंडारा यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून दि. ८ जानेवारी रोजी रेतीने भरलेले १७ टिप्पर जप्त केले होते. त्या सतराही टिप्परच्या चालक व मालकावर पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

टिप्पर ट्रक क्र. MH 36 AA 4845: चालक/मालक लक्ष्मीकांत राम रतन बेंदरे (वय ३३) रा. बेटाळा.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 AB 2845: चालक/मालक मंगेश देवचंद नेहरकर (वय ३३) रा. बेटाळा.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 BL 2449: चालक/मालक विक्की कैलास मडावे (वय ३०) रा. सुरेवाडा.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 AJ 2241: चालक/मालक धीरज विनोद मेश्राम (वय ३३) रा. इंजेवाडा.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 G 3774: चालक/मालक जागेश्वर बाबूराव मेश्राम (वय ३२) रा. दहेगाव ता. मोहाडी.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 AA 1213: चालक/मालक सम्यक विनोद नारनवरे (वय ३५) रा. दाभा.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 DC 6399/44: चालक/मालक अनिल बाबूराव ढेंगे (वय ४४) रा. टाकळी.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 CM: चालक/मालक चंद्रशेखर लक्ष्मण शेंद्रे (वय ३४) रा. पालगाव ता. भंडारा.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 CT 0130: चालक/मालक मिलिंद सुदाम सुखदेवे (वय ३३) रा. पलाडी.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 CT 9130: चालक/मालक आकांत प्रभुदास बनपूरकर (वय ३५) रा. भोजापूर.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 CM 9452: चालक/मालक प्रशांत सुखदेव मारबते (वय ३२) रा. खैरी.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 BF 9130: चालक/मालक सूर्यभान विनोद सेलोकर (वय ३२) रा. बोरगाव खुर्द.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 AA 9130: चालक/मालक प्रवीण चित्तोप्रभू पुरी (वय ३२) रा. देव्हाडा बु. ता. मोहाडी.

टिप्पर ट्रक क्र. MH 49 BZ 0518: चालक/मालक सागर गणेश चिनकुरे (वय ३२) रा. जमनी.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 BF 9002: चालक/मालक श्याम विठ्ठल बाबरे (वय ३२) रा. बोथली ता. मोहाडी.

टिप्पर ट्रक क्र. MH 40 CT 9002: चालक/मालक (वय ३४) रा. पांजरा ता. मोहाडी.

टिप्पर ट्रक क्र. MH 36 AB 1343: चालक संदीप रघुजी सावे (वय ३४) रा. बोरगाव खुर्द ता. जि. भंडारा.

यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १३७ ब्रास रेती (किंमत ८ लाख २२ हजार) आणि १७ टिप्पर (किंमत ६ कोटी २० लाख) असा एकूण ६ कोटी २८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करताना हे पथक मिळून आले आहे. पुढील तपास सपोनि निलेश गिरी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *