उकारा येथील वन जमिनीवर अवैधरित्या केले अतिक्रमण काढले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा वनविभागामार्फत वनक्षेत्र साकोली अंतर्गत उकारा येथील वन जमिनीवर अवैधरित्या केलेले अतिक्रमण निष्कासनाबाबतची कारवाई करण्यात आली. साकोली वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या किन्ही नियतक्षेत्रातील उकारामध्ये श्रीमती ताराबाई प्रभाकर येसनपुरे रा. साकोली यांनी ०.१२ हे. आर., जयदेव धोंडू येसनपुरे रा. चारगाव यांनी ०.०६ हे. आर., प्रभाकर धोंडू येसनपुरे रा. साकोली यांनी ०.१४ हे. आर. व संजयकुमार प्रमोद नशीने रा. साकोली यांनी ०.१५ हे. आर. अतिक्रमण केले होते. भंडारा वनविभाग अंतर्गत अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कारवाई भंडाराचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, संरक्षण व अतिक्रमण निमर्ुलन) संजय मेढे यांचे मार्गदर्शनात साकोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी केली. साकोली वनपरिक्षेत्र व लाखनी वनपरिक्षेत्र येथील वनकर्मचारी यांनी पार पाडली. तसेच उकाराचे सरपंच श्रीमतूी शालू धनंजय इळपाते, पोलीस पाटील मानीकराव सिताराम तरोने यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *