तुमसर रोड स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा “सर्जिकल स्ट्राईक’

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- रेल्वे प्रवासादरम्यान नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या भरारी पथकाने शुक्रवारी २ जानेवारी रोजी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर धडक कारवाई केली. विना तिकीट प्रवास, रेल्वे रूळ ओलांडणे आणि महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर या मोहिमेत दणका देण्यात आला. या विशेष मोहिमेत एकूण १८९ प्रकरणांचा निपटारा करून ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

२ जानेवारी २०२६ रोजी सकाळीच रेल्वे प्रशासनाच्या भरारी पथकाने तुमसर रोड स्थानकावर आपली मोहीम सुरू केली. या कारवाईत विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफॉर्म तिकीट नसणे, पुलाचा वापर न करता जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडणे आणि महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात बसून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना पथकाने ताब्यात घेतले. रेल्वे सुरक्षा दलाच्या (ठझऋ)मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *