सोनसाखळी चोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- रस्त्यात महिलांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने गजाआड केले. याप्रकरणी छत्तीसगड राज्यातील चार जणांना आय-२० कारसह ८ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन जवाहरनगर हददीतील मौजा खरबी येथे वर्षे २२ ते २५ या वयोगटातील तिन मुले व एका मुलीने मौजा खरबी, भंडारा राष्ट्र ीय महामार्ग क्रमांक ५३ वर स्थानिक म्हातारीला रस्त्यावर एकटी चालत असल्याचे पाहूण खरबी सर्व्हिस रोडवर भंडाराकडे जाणारा रस्ता विचारला व त्यानंतर संगणमत करुन तिचे अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.
सदरचेघटनेवरुन फिर्यादी श्रीमती सुमन माणिकराव घाटोळे, रा. खरबी यांचे तक्रारीवरुन पो स्टे. जवाहरनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. उपरोक्त गुन्हयाचे गार्भर्यि लक्षात घेता पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळर यांनी प्रॉपर्टी सेल पथकास सुचना दिली. पथकाने फिर्यादी यांनी गुन्ह्यात वापरलेल्या आय-२० वाहनाचा शोध घेण्यासाठी भंडारा-साकोली मार्गे रायपूर येथे रवाना झाले.
रायपुरपर्यत सदर वाहनाचा सुगावा घेत पथकाने वाहन रायपूर हद्दीत डिटेन करून त्यातील इसमानां त्यांचे नाव वगाव विचारले. त्यांनी आशिष मनोहर भट्टाचार्य (वय २६) रा. वार्ड नं. १० नवीन बस स्टॉप दुर्गापुर रायपुर, शुभम होरीलाल सोनी (वय २१) रा. धमतरी, दुर्गा मंदीर केपास,धमतरी छत्तीसगड, सौरभ लोभनदास बंजारा (वय २२) रा. वार्ड नं १२, शितलापारा, धमतरी छत्तीसगड व दिपीका घनश्याम गंगबेर (वय २३) रा, लोहरसी केंद्रीय विदयालय जवळ धमतरी, छत्तीसगड सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी जवाहरनगर येथील व सोबतच कारथा येथे सुध्दा सारखाच गुन्हा करुन एका महीलेची सोनसाखळी चोरी केलीअसल्याचे कबुल केले. तसेच त्यांनी पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत अपराध केल्याचे कबुल केले. आरोपींतांचे कबुलीनंतर उक्त नमुद तिन गुन्हे उघड झाले.
आरोपीतांनी हिसकावुन नेलेल्या एकुण मुद्देमाल पैकी ६४ हजार रुपये राख रक्कमसह ८ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. वाहनासह मुद्देमाल पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन जवाहरनगर यांचे सुपूर्द करण्यात आलेला आहे. ही कारवाही पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी त्यांचे अधिनस्त पॉपर्टी सेल पथक प्रभारी अधिकारी विवेक सोनवने, पोहवा. डहारे, पोहवा. देशमुख, मपोहवा तिवारी, पोशि. पोटे, देशमुख, ठाकरे व चालक तिवाडे, गजभिये व पोलीस स्टेशन जवाहरनगर येथील ठाणदार भिमाजी पाटील, पो.ना. रमाकांत बोंदरे, पोशि. नितीन भालाधरे, राहुल तिडके यांनी पार पाडली.









