नायलॉन मांजाची विक्री केल्यास व वापरल्यास दंड; भंडारा न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले

भंडारा :- पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिक यांना इजा होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली आहे. तरी कोणीही घाऊक (व्होलसेलर) विक्रेते, किरकोळ विक्रेते व साठा करणारे व्यापारी पतंगांसाठी नायलॉन मांजाविकी करताना किंवा साठा करतांना आढळून आल्यास तसेच कोणीही नागरिक नायलॉन मांजा वापर करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या ८ अन्वये अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी आज त्यांच्या कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

मकरसंक्रांतीच्या सणावेळी पतंग उडविण्याकरिता प्लॉस्टिक किवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारणपणे नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पङ्ख्‌या घाम्यामुळे पक्षी, प्राणी व मानवजिवितांस इजा पोहचत्री जाते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. अशा प्रकारच्या धाम्यामुळे होणाऱ्या प्राणघातक हजापासुन पक्षी व मानव जिवितांस संरक्षण करण्याची गरज आहे. त्याअधी, पर्यावरण (संरक्षण) अधिनयम १९८६ चे कलम ५ अन्वये खालीलप्रमाणे नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे. नायलॉन मांजाचा वापर करणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते बंदीबाचत नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट आले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार १) एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवतांना आढळल्यास. त्याच्या पालकांना ५० हजार रुपयांचा दंड न्यायालयात जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत, २) प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आवळल्यास, त्या व्यक्तीला २० हजार रुपयांचा दंड न्यायालयात जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत, ३) तसेच नायलॉन माजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून साठा जप्त झाल्यास, प्रत्येक उल्लंघनासाठी न्यायालयात २ लाख ५० हजार रुपयांचा दंड जमा करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

न्यायालयाच्या आदेशानुसार, भंडारा शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. आदमने यांच्या दुकानात नॉयलान मांजा मिळाला असून त्याची तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. त्यांना दंडाची नोटीस देण्यात येणार आहे. चार दुकानात पाहणी करण्यात आली आहे.

बाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री साठवणूक थांबवावी ज्यायोगे संपूर्ण वर्षभरात त्यांची साठवणूक हाताळणी व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिक विशेषतः विद्यार्थी, युवक यांनी पतंग उडवितांना मांजाचा वापर करू ये, असेही आवाहन जुम्मा प्यारेवाले यांनी केले. यावेळी इंजि. रंजित बिसेन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *