इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि “आप’ ची तिसरी आघाडी

कोल्हापूरः- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येत कोल्हापूर मनपा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजच ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्याने आम आदमी पार्टीने वेगळा पर्याय निवडत वंचित आघाडीशीहातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरसाठी तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून ठिणगी पडली आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष हा सुद्धा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *