भरधाव वेगातील कारचे टायर फुटले: जि. प. सदस्य डॉ. प्रतीक उईक थोडक्यात बचावले
दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना समोर शुक्रवारी दि. २६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतीक उईके रा. सोनी यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. चालत्या गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी डॉ. प्रतीक उईके सुदैवाने बालबाल बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रतीक उईके हे पंचायत समिती सदस्य मधुर उके यांच्यासोबत काही कामानिमित्ताने नागपुरला गेले होते. नागपुरवरून परत येतांना डॉ. उईके यांनी पंचायत समिती सदस्य मधुर उके यांना त्यांच्या बारव्हा या गावी सोडून दिल्यानंतर सोनी या स्वगावी चारचाकी वाहनाने जात होते. मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखांदूर समोर त्यांच्या एक्य.यु.व्ही. या चार चाकी वाहनाचा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, नशिबाची साथ आणि वेळेत बचाव कार्यामुळे डॉ. उईके यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर सामसून होती. मात्र, अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. डॉ. प्रतीक उईके सुखरूप असल्याची बातमी मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.









