महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही मुरूम उत्खन धडाक्यात
महसूल विभागाने कारवाई केल्यानंतरही सिहोरा, सोनेगाव व धनेगावच्या मध्य भागी आणी चांदपूर जलाशयाच्या कालव्या लगत असलेल्या शेत शिवारातून अवैध मुरूम उत्खनन सुरूच असल्याचे वृत्त आहे. सदर मुरूम हा पिपरीचुन्नी तसेच ठिकठिकाणी सुरू असलेल्या रोडवर कोट्यावधीचे मुरूम बिना रॉयल्टी चोरी करून सोडले जात आहे. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुद्धा बुडत आहे. या प्रकरणात अभय कुणाचा असा प्रश्नउपस्थित होत आहे. महसूल विभागाने या प्रकरणात दखल घेण्याची गरज आहे.महसूल विभागाचे अधिकारी व मुरूम माफिया यांच्यात पाणी तर मुरत नाहीना अशीही चर्चा जोर धरत आहे. मुरूम माफीयांची मुजोरी वाढली आहे. दबंग मुरूम माफिया ऐकत नसल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे या माफियावावर नियंत्रण नाही असे समजते. यात शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. शासनाने कोट्यावधीच्या कामाला मंजुरी दिली आहे. परंतु गर्भ श्रीमंत ठेकेदार शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. या मुरूम माफियावर कार्यवाही करण्याची गरज आहे.