विशाल डेकाटे यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवच्या हस्ते रेल सेवा पुरस्कार
विशाल डेकाटे हे उत्तर रेल्वे विभागात, नवी दिल्ली येथे रेल भवनात, वरिष्ठ खंड अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी २०२३-२०२४ या कालावधीत विद्युत कर्मचाऱ्यांना विद्युत वाचविण्याबाबत विशेष प्रशिक्षण दिले. कर्मचारीने दिलेल्या प्रशिक्षणाचे अनुकरण केल्याने रेल्वेचे तब्बल ४ लक्ष ८६ हजार १८० विद्युत युनिट वाचविले. यातून रेल्वेचे तब्बल ४१ लक्ष ३२हजार ५३० रुपयाची बचत झाली. आई व वडील रवीकुमार डेकाटे यांच्या संस्कारात व मार्गदर्शनात वाढलेले विशाल डेकाटे हे सुरुवातीपासून हुशार व्यक्तिमत्व होते. यांनी आपले प्राथमिक शिक्षण अरविंद विद्यालय बघेडा येथे पूर्ण केले. यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर येथे परिश्रम घेतले. विशाल डेकाटे यांना यापूर्वीही विविध उल्लेखनिय कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. विशाल डेकाटे यांनी केलेल्या कार्याच्या सर्वत्र गुणगौरव होत असून त्यांच्यावर व संपूर्ण परिवरावर सर्व स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहेत.