मध्यरात्रीच्या सुमारास गोंदियाच्या रामदेवराबाबा मंदिरातून रामदेवबाबाचा ५ किलो चांदीचा पुतळा चोरीला

गोंदिया:- गोंदिया शहरातील रेलटोली परिसरात असलेल्या प्राचीन आणि भव्य राजस्थानच्या जैसलमेर जवळील रुणिचानाथ आणि कृष्ण अवतार म्हणून पूजल्या जाणाऱ्या भगवान बाबा रामदेव यांच्या मंदिरावर अज्ञात चोरट्याने मध्यरात्री डल्ला मारला. ३ ते ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामदेवबाबांची सुमारे ५ किलोची चांदीची मूती चोरीला गेली. रात्री ही चोरी मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात चोरटयानी मुती चोरून नेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यात सावध असलेला रंगीत निळा शर्ट घातलेला मध्यमवयीन चोरट्यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंदिरात प्रवेश केला आणि नंतर आपली चोरी यशस्वीपणे पार पाडली. चोरट्याने केलेल्या चोरीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. त्यामध्ये चोरट्याने आपली ओळख लपविण्याकरिता माकड टोपी घालून मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर चोरीच्या उद्देशाने लाखो रुपये किमतीची ५ किलो चांदीची मूती चोरून नेल्याचे दिसत आहे.

चोरट्याने ज्या पद्धतीने मूतीचोरी केली, त्याची त्याला आधीच माहिती होती असे चोरीच्या प्रकारातून कळते तसेच त्याला मंदिरातील परिस्थिती ची ही बरीच माहिती होती, असे ही त्याच्या वर्तणुकीतून लक्षात येते. अशास्थितीत रामनगर पोलिसांना माहिती देऊन तक्रार नोंदवून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरीनंतर पोलिसांनी तपासासाठी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट तज्ञही तैनात केले असून, पोलिसांना चोरट्यापयत किती दिवसात पोहचते हे पुढे कळणार. गोंदिया शहरातील रेलटोलीपरिसरातील प्रसिद्ध रामदेवराबाबा मंदिरातून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना ४ फबवारी रोजी पहाटे ५.१५ च्या सुमारास उघडकीस आली. ३ ते ४ फेब ्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गर्भगृहाच्या दाराचा कोंडा तोडून अंदाजे ५ किलो वजनाची चांदीची मूतर्ी व १ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका असा १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी हरिलालभाई राठोड (६२) रा. गड्डाटोली,गोंदिया यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच गोंदियाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमेद खोपीकर करीत आहे. घटनास्थळा वरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. यात एक ४५ ते ५० वयोगटातील एक आरोपी दिसून येत आहे. या चोर आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आल्याचे तसेच चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल असे रामनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी “लोकजन’ सोबत बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *