आम्रपाली भिवगडे यांना आचार्य पदवी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तर्फे प्रियदर्शनी अध्यापक विद्यालय भंडारा येथील प्राचार्या आम्रपाली सुमन एकनाथ भिवगडे यांना समाजकार्य या विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी “कोविड-१९ महामारीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक स्थितीचा अभ्यास आणि सामाजिक कार्य हस्तक्षेप (भंडारा तालुका आणि जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विशेष संदर्भात) हा शोधनिबंध सादर केला होता. हे संशोधन प्रा.डॉ. नरेश एस.कोलते यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले आहे.

या प्रबंधाला आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथील संशोधन केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. याबद्दल संस्था अध्यक्ष डॉ. केदारसिंह रोटेले, उपाध्यक्षा डॉ. किरण रोटेले, कार्य. प्रा. नरेश कोलते, प्रा. प्रज्ञा गणेर, प्रा.अर्चना सेंगर (बाच्छिल), प्रा. प्रफुल आपटे, प्रा. रझिया वर्धन, प्रा. प्रिती सरादे, वैशाली पाऊलझगडे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *