गोंदिया जिल्ह्यातील पालिका निवडणूकीत काँग्रेस पक्षाच सरशी भाजपाचा लाजिरवाणा पराभव

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात २ डिसेंबर आणि उर्वरित २० डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पालिका निवडणूकीचा निकाल रविवार २१ डिसेंबरला जाहीर करण्यात आला.यात कांग्रेस पक्षाने ४ पैकी ३ पालिकेवर निवडणूक जिकंुन सरशी मिळवली तर भाजपला १ जागेवर समाधान मानावे लागले गोंदिया नगर पालिका निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेद्वार सचिन शेंडे यांनी भाजपच्या कशिश जायस्वाल यांचा सुमारे २३०० मतांनी पराभव केला. त्यांच्या या पराभवाला शिवसेना शिंदे गटाचे डॉ. प्रशांत कटरे यांनी घेतलेले ८ हजार मत कारणीभूत ठरले असल्याचे राजकीय वतर्ुळात बोलले जात आहे.

तिरोडा पालिका निवडणूकीत भाजपचे अशोक असाटी यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजय गौर यांचा पराभव केला.तर अनु.जमाती करिता राखीव असलेल्या गोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेस पक्षाचे तेजराम बिसने यांनी शेवटच्या क्षणी भाजप प्रवेश केलेले अजय कोठेवार यांचा पराभव केला. सालेकसा नगरपंचायतीत सर्व साधारण करिता राखीव असलेल्या जागेवर भाजपने राजेंद्र बडोले यांना उमेद्वारी दिली असल्यामुळे या जागेवर काँग्रेसच्या विजय फुंडे यांनी भाजपच्या राजेद्र बडोले यांचा ५६५ मतांनी पराभव केला.

नगरपालिका निवडणुक ही स्थानिक मुद्यांना घेवुन लढवली जात असली तरी या निवडणुकीत भाजप उमेद्वाराच्या प्रचाराकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेद्वाराचा प्रचाराकरिता हजेरी लावली होती.तर कांग्रेस पक्षाची धुरा माज गोंदिया नगरपालिकेत नगराध्यक्ष उमेद्वार निवडतांना झालेली चुक आमदाराच्या पथ्यावर पडली आहे.आमदार विनोद अग्रवाल यांनी दिलेले उमेद्वार कशिश जायस्वाल यांचा पराभव आ.अग्रवाल यांना जिव्हारी लागला असल्याची चर्चाशहरात केली जात आहे. तसेच गोरेगांव नगरपंचायतीत ऐनवेळेवर भाजपमध्ये प्रवेश करून उमेद्वारी मिळवलेले गोंदिया नगरपालिकेत नगराध्यक्ष उमेद्वार निवडतांना झालेली चुक आमदाराच्या पथ्यावर पडली आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांनी दिलेले उमेद्वार कशिश जायस्वाल यांचा पराभव आ.अग्रवाल यांना जिव्हारी लागला असल्याची चर्चा शहरात केली जात आहे. तसेचगोरेगांव नगरपंचायतीत ऐनवेळेवर भाजपमध्ये प्रवेश करून उमेद्वारी मिळवलेले अजय कोठेवार यांचा पराभव पण आमदार.विजय रहांगडाले यांचा पथ्यावर पडणार आहे. सालेकसा नगरपंचायतीत सर्वसामान्य पुरूषाकरिता राखिव असलेल्या जागेवर भाजप आमदार संजय पुराम यांनी अनु.जातीचे उमेद्वार दिल्यामुळे नाराजअसलेल्या जनतेनी त्यांना धडा शिकवण्याकरिता भाजप उमेद्वाराला पराभवाचा झटका दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *