१४५ कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप, प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, आता सुषमा अंधारेंनी मोबाईवरून पुरावेच दाखवले, म्हणाल्या, ते हॉटेल…

मुंबईः- शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी १७ डिसेंबर रोजी केला. मात्र साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरीत गावातील एका रिसॉर्टमध्ये टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप होत आहे. अशातच प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्याचबरोबर प्रकाश शिंदे यांनी सुषमा अंधारेंचे सर्व आरोप फेटाळले होते, तर ते हॉटेल आपण चालवत नाही, दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे, अशी माहिती प्रकाश शिंदेंनी दिली, त्यानंतर आज अंधारेंनी ते हॉटेल प्रकाश शिंदेंचं आहे आणि तेच ते हॉटेल चालवत असल्याचे पुरावे त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *