आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक परीक्षा पास करूनही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा:- १६ डिसेंबर-आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक परीक्षा पास करूनही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तथा विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर केला आहे.

महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज सिहोरा येथील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी प्रत्युष रविकिरण वासनिक, रागिणी विजय नागदिवे, विनल सुरेश, गणेश मोतीराम देव्हारे, आकांशा भास्कर माने या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन द्वारा घेण्यात येणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) परीक्षा वर्ष २१-२२ मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत असताना उत्तीर्ण केली त्यानुसार त्यांना चक २०२२२३००४२९१०९७ ही आयडी प्राप्त करून वर्ष २३-२४ मध्ये प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली. वर्ष २४-२५ मध्ये महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज सिहोरा येथे विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व NSP पोर्टलमध्ये नूतनीकरण अर्ज सादर केला सोबतच MHDBT पोर्टलमध्ये शिक्षकांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जाती शिष्यवृत्ती करिता अर्ज सादर केला. परंतु NMMS विभागाने सदर विद्यार्थ्यांना MHDBT ची १७०४ रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली व NMMS गुणवत्ता शिष्यवृत्ती १२ हजार रुपये नाकारण्यात आल्याचे वृत्त पुढे आले आहे.

शिक्षकांना माहीत होते की आपल्या विद्यालयात NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत तरी त्यांच्याकडून MHDBT शिष्यवृत्ती चे फार्म भरून घेतले त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये फार असंतोष निर्माण झालेला आहे यावर तोडगा काढण्याकरिता विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे, सचिव मोतीलाल ठवकर, बाला तुरकर, राजू मेळेवार, रविकिरण वासनिक यांनी संबंधित विद्यालयाच्या शिक्षकांची संपर्क साधला व विद्यार्थ्यांच्या संदर्भात चर्चा केली असता शिक्षकांकडून त्यांना उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले त्यांचे समाधान करण्यात आले नाही व विद्यार्थ्यांवर झालेल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *