पाच वर्षीय चिमुकलीवर परप्रांतीयाचा अतिप्रसंगः लाखांदूर कडकडीत बंद

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर:- गत ९ दिवसांपूर्वी शहरात ५ वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीयाकडून झालेल्या अतिप्रसंगा विरोधात लाखांदूर पेटून उठला असून त्या प्रसंगाविरोधात १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय नागरिकांकडून लाखांदूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंद च्या सुरुवातीलाच शिवाजी टी पॉइंट येथे उपस्थित गर्दीला संबोधताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, लाखांदूर पोलिसांच्या मध्यास्तीने हा वाद संपुष्टात आणून पुढे या मोर्चाचे प्रस्तान झाले. आणि सर्वाशेवटी चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात सर्वधर्मीय नागरिकांकडून काही मागण्यांचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी अंगणात खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीवर एका विधिसंघरशित परप्रांतियानेअतिप्रसंग केला. त्याचे विरोधात लाखांदूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली असली तरी ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे, या घटनेच्या आणि या प्रसंगाच्याविरोधात लाखांदूर पेटून उठला. याच्या निषेधार्थ आणि काही मागण्या घेवून १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय आणि सर्व पक्षीय लाखांदूर बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *