उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना “पांघरुनात घेतलास तू’ म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
नागपूर:- शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळा जाऊन शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? असा सवाल उपस्थित केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर अल्पसंख्यांकांच्या व्होटबँकेसाठी केलेल्या टीकेवरूनही पलटवारदेखील केला. कोण होतास तू, काय झालास तू. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.
यावेळी, अमित शाह यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडिओ देखील फडणवीसांनी शेअर केला होता. त्यावर, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुनात घेतलास तू असे म्हणत पलटवारकेला. मला मुख्यमंत्र्यांची दया येते की कोण होतास तू काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू, स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. तसेच, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असेही ते म्हणाले.









