खोटे दस्तावेज सादर करून अवैधरित्या जमिनीवर कब्जा :जमीन विक्रेताचे आरोप
आमगाव :- आमगाव शहरात आमची वडिलोपार्जित जमीन असून माझ्या वडिलांनी विकलेल्या जागेवर राणी कालसर्पे महिलेने खोटे दस्तावेज सादर करून अवैधरित्या जमिनीवर कब्जा मिळिवला आहे असा आरोप संतोष लक्षणें यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. आयोजित पत्र परिषदेत त्यांच्यासोबत हंसराज मनोहर लक्षणे, आशिष हेमराज लक्षणे, संतोष लक्षणे, मनोहर सिंगनजुडे मालती रगडे इत्यादी उपस्थित होते. संतोष लक्षणे यांनी पत्र परिषदेत सांगितले की, आमगाव शहरात त्यांची वडिलोपार्जित जमीन असून सन १९७१ मध्ये वडिलांनी घराच्या मागे असलेला एक प्लॉट १२०० चौ. मी. महादेव कृष्णाजी खंडाळकर राहणार सडक पिंपळगाव तालुका साकोली यांना विक्री केले.
रजिस्ट्री झाल्यानंतर जमीन मालक महादेव कृष्णाजी खंडाळकर हे बाहेरगावी राहत असल्यामुळे त्यांच्या वारसदारांना सुद्धा प्लॉटची माहिती नसल्यामुळे त्यांनी फेरफार केला नाही. कित्येक वर्षी तो प्लॉट तसाच पडून होता. याचाच फायदा घेत शहरातील राणी राजेश काळसर्पे या महिलेने नकली दस्तावेज तयार करून मी महादेव कृष्णाजी खंडाळकर यांची नातसून आहे असे दर्शवून तहसील कार्यालय आमगाव येथे मे २०२५ ला फेरफार करण्यासाठी अर्ज केला. त्या अर्जाची शहानिशा करण्याकरता तहसील कार्यालयातर्फे लक्षणे परिवाराला ६ मे २०२६ ला सूचना देण्यात आली होती. तेव्हा लक्षणे परिवारातील सदस्यासह मी संतोष बळीराम लक्षणे व कुटूंबायांनी आक्षेप घेत या महिलेचे महादेव कृष्णाजी खंडाळकर यांच्याशी कुठलेही रक्त संबंध नाही व मला पुरावा सादर करण्याकरता वेळ द्यावा अशी मागणी केली.
परंतु आईची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे व आई दवाखान्यात भरती असल्यामुळे मी तहसीलदार मॅडम यांनी दिलेल्या तारखेला हजर राहु शकलो नाही. माझी आई मरण पावल्यानंतर काही दिवसानंतर मी पुरावा सादर करण्याकरता तहसीलदारम मॅडम यांचेकडे गेलो असता असे कळले की त्यांनी राणी राजेश काळसर्पे यांच्या बाजूने निर्णय दिला. सदर महिलेने रीसामा येथील पोलीस पाटलाकडून खोटी वंशावली सादर करून व नातेसंबंध असल्याचे खोटे पुरावे सादर करून जमीन फेरफार करिता कागदपत्र सादर केले. मी तहसिलदार मॅडम यांना पुरावे दाखवून सुद्धा कुठलीही चौकशी न करता तहसिलदार मॅडम यांनी कोणत्या आधारावर निर्णय दिला याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस पाटलांकडून सादर केलेल्या वंशावळ मध्ये जानकी महादेव खंडाळकर असे महादेव खंडाळकर यांच्या पत्नीचे नाव असून मी त्यांच्या मुलीची सून आहे असे खोटे दस्तावेज सादर केले आहे.
जेव्हा की महादेव कृष्णाजी खंडाळकर यांच्या पत्नीचे नाव अंजली महादेव खंडाळकर असून त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र व इलेक्शन कार्ड सुद्धा पुरावा म्हणून मी सादर केलेला आहे. व तसेच मी उपविभागीय अधिकारी देवरे यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. व सदर महिलेने खोटे दस्तावेज सादर करून जमिनीवर हक्क दाखवणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात यावी व पोलीस पाटील रिकामा यांनी कोणत्या आधारावर वंशावली दिली याची सुद्धा चौकशी व्हावी अशी तक्रार उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे. त्यामुळे सदर महिला राणी राजेश काळसर्पे मला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत आहे.
मी अपंग असल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे करिता मी पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. तसेच महादेव कृष्णाजी खंडाळकर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची वंशावळ व पुरावा सादर केला असून महादेव कृष्णाजी खंडाळकर यांच्या कुटुंबीयांना त्यांचे अधिकाराची जमीन देण्यासाठी त्यांना सहकार्य करीत आहोत. परंतु सदर महिला मला व माझ्या कुटुंबीयांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत आहे. तरी प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन मला न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करीत आहे असे संतोष लक्षणे यांनी पत्र परिषदेमध्ये सांगितले आहे.









