राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचा समारोप

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर, महाराष्ट्र व भंडारा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि एसजीबी डिफेन्स ज्युनिअर कॉलेज शहापूर, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एसजीबी डिफेन्स ज्युनिअर कॉलेज शहापूर, जिल्हा भंडारा येथे राज्यस्तरीय इन्स्पायर मानक प्रदर्शन व स्पर्धा २०२३- २४ व २०२४- २५ अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले.

सदर प्रदर्शनामध्ये राज्यातील एकूण ३७६ वैज्ञानिक प्रतिकृती सादर करण्यात आल्ाा. त्रिदिवसीय राज्यस्तरीय प्रदर्शन स्थळी असलेली एसजीबी डिफेन्स ज्युनिअर कॉलेजचेप्राचार्य नरेंद्र पालांदूरकर यांच्या अतिशय नियोजनबध्द व्यवस्था अनुभवून राज्यभरातील बाल वैज्ञानिक विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक भारावून गेल्याचे दिसून आले. राज्यस्तरीय इन्स्पायर मानक प्रदर्शनातून सत्र २०२३-२४ मधील १४ व सत्र २०२४-२५ मधील २१ एकूण ३५ प्रतिकृतींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या बालवैज्ञानिकांचा गुणगौरव करण्यात आला. सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूरचे संचालक राजकुमार अवसरे हे होते.

मुख्य अतिथी एन.आय. एफ. अहमदाबादचे शास्त्रज्ञ तथा समन्वयक डॉ. सुनिल भास्कर, डॉ. संध्या तिवारी भंडारा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नितु गावंडे, डॉ. हेमलता बांबल, एसजीबी डिफेन्स सर्व्हिसेस ज्यू. कॉलेज शहापूरचे संस्थापक नरेंद्र पालांदुरकर, इन्स्पायर मानक राज्य समन्वयक भास्कर, भंडारा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रमोद सेलोकर व प्राचार्य वंदना लुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न झाला.त्रिदिवशीय प्रदर्शन अहवाल वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नितु गावंडे यांनी सादर केले. त्यानंतर एक बालवैज्ञानिक विद्यार्थी व एक शिक्षक यांचे प्रदर्शनाचे अनुषंगाने प्रतिक्रियात्मक मनोगत व्यक्तकेले.

अत्यंत उत्साह व प्रेरणादायी समारंभाचे आयोजन व नियोजन तसेच प्रदर्शन अंतर्गत बालकांना व शिक्षकांसाठी उपलब्ध केलेली व्यवस्था ही अतुलनीय असून पुन्हा अशा ठिकाणी राज्यस्तरीय उपक्रमांचे आयोजन व्हावे असे मत याप्रसंगी शिक्षकांनी व्यक्त केले. देशपातळीवर निवड झालेल्या सर्व बालवैज्ञानिकांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. व पुढील स्पर्धेकरिता आवश्यक मार्गदर्शन एन. आय. एफ. शास्त्रज्ञ यांनी केले. अहवाल वाचन समन्वयक डॉ. नितू गानंडे, संचालन वैशाली लेंडे, संजय भोवते यांनी केले व आभार वरिष्ठ अधिव्याख्याता हेमलता बांबल यांनी व्यक्त करून वंदे मातरम गीताने प्रदर्शनाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *