शिंदेंच्या मंत्र्यांची खरी नाराजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर, प्री कॅबिनेटमध्येच बहिष्काराचं ठरलं होतं
मुंबई:- भाजपच्या ऑपरेशन लोटसवरुन शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं. त्यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शिंदेंच्या मंत्र्यांची प्रमुख नाराजी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात असल्याचं समोर आलं आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केले जात आहे.,
कल्याण डोंबिवलीत वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप शिंदेंच्या मंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसवर शिंदेंची शिवसेना नाराज आहे. त्याचमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.









