जि. प. शाळेच्या जान्हवी ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा तालुका, जिल्हा, प्रदेश व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येतात. नुकत्याच झालेल्या प्रादेशिक क्रीडा स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद साकोलीची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी जानवी तरोणे हिने गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व तिची निवड आता राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झालेली आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी येत्या काही दिवसात होणार आहेत. त्यासाठी जान्हवी तरोणे पात्र ठरली आहे.

यावेळी शाळेचे मुख्या. धर्मेंद्र कोचे यांनी अभिनंदन करून मार्गदर्शन केले तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बी. आर. चव्हाण यांनी तिला खेळण्यासाठी प्रोत्साहन केले व खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. क्रीडा शिक्षक मार्गदर्शक सुशांत बांडेबुचे यांच्या नेतृत्वाखाली तिने दैनंदिन सराव करून हे यश संपादन केले. तिच्या यशाने शाळेचा नावलौकिक वाढला. याप्रसंगी वर्गशिक्षिका आशा चौधरी, शिक्षक डॉ. मनोज बागडे, मनोहर भैसारे, धनराज मसराम, पल्लवी शिंदे, नरेश बाळबुद्धे, गिरीश सोनवाणे, अमित डोये, मुकेश गुरनुले, समीर कानेकर, सौरभ मरस्कोले, लीना हुमणे, पायल गणवीर, तौसिफ सय्यद, कुमुद नाकाडे, सचिन लुटे, नेकराज वजाडे, प्रयागराज बोरकर, ईमरान तुरक, मनीषा खुणे, पूनम कुंभरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *