भंडारा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगर परिषदेची निवडणुक २ डिसेंबर रोजी होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. भंडारा नगर परिषदेतील ८५ हजार ६०८ मतदान १७ प्रभागातील ३५ नगरसेवकांना व एक नगराध्यक्षांना निवडणून देणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज्ा असल्याची माहिती भंडारा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा उपविभागीय अधिकारी श्रीमती माधुरी तिखे यांनी आज नगर परिषद सभागृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, उपमुख्याधिकारी आकाश शहारे उपस्थित होते. श्रीमती माधुरी तिखे पुढे म्हणाल्या, राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर त्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे. छाननी १८ नोव्हेंबर, माघारीची अंतिम मुदत अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर आणि अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. रविवारी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाही. नामनिर्देशनपत्र न. प. अल्पसंख्याक वसतीगृह, मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा येथे स्विकारले जाणार असून तेथेच मतमोजणी होणार आहे. भंडारा नगर परिषदेत १७ प्रभाग आहेत.

यापैकी १६ प्रभागात दोन सदस्य तर प्रभाग तर प्रभाग ६ मध्ये तीन सदस्य निवडणून द्यायचे आहेत. ८५ हजार ६०८ मतदार असून ११० मतदान केंद्र राहणार आहेत. एका मतदान केंद्रावर ८०० ते ९०० मतदार मतदान करणार आहेत. ईव्हीएम मशिन तयार आहेत. मतदार यादीवर २१५ हरकती व ७५०० मतदारांचे आक्षेप आले होते. त्यापैकी अनेक आक्षेप दूर करण्यात आले आहे. ७११ दुबारसुरळीत निवडणुकीसाठी मतदार आहेत ७ डिसेंबर २०२५ रोजी बुथप्रमाणे मतदार यादी प्रकाशित होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतही आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या निकालापर्यंत आचारसंहिता प्रभावी राहील. मतदान सुरू होण्याच्या २४ तास आधी म्हणजेच ३० नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून प्रचारबंदी लागू होईल. या कालावधीनंतर सभा, मोर्चे तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणुकीशी संबंधित जाहिराती, प्रसारण व प्रचारात्मक उपक्रम पूर्णपणे बंद राहतील. शहरातील बॅनर काढण्यात आले आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून शांत, पारदर्शक व आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केल्याचे श्रीमती माधुरी तिखे यांनी दिली. राज्य निवडणुक आयोग पुढे जे मार्गदर्शक दिशा ठरवतील, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सर्व सोयीसुविधा राहणार आहेत, अशीही माहिती श्रीमती तिखे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *