खाजगी व्यापारांना धान विकतांना सावधान
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ढिवरवाडा गावात सालई खु येथील खाजगी धान्य व्यापारी सुरचंद नेवारे हे चार वर्षे पासून ढिवरवाडा येथे धान खरेदी करीत असून यावर्षी पंधरा दिवसांपासून धान खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू केला असताना काही शेतकऱ्यांनी धान विक्री केली. परंतु आज काही शेतकरी इलेक्ट्रॉनिक काट्यावर धान मोजमाप करीत असतांना बोरा मध्ये ९० किलो भरतीचा वजन झाले असतांनाही वजन काट्यावर धानाचे वजन कमी दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संशय आला.
त्यामुळे पाच ते सहा धानाच्या पोत्यांचा वजन करून बाजुला करून ठेवले होते आणित्याच धानाच्या पोत्यांचा वजन व्यापारी यांनी केले असता सात ते आठ किलो कमी दाखवत असल्याने शेतकऱ्यांनी त्या व्यापारी जवळील पेन पाहिले असता हा प्रकार उजेडात आला. सविस्तर असे की, धान्य व्यापारी कडे एक मैजिक पेन आहे त्या पेन च्या सहाय्याने जेव्हा काट्यावर धानाचे वजन करीत असतांना व्यापारी खिस्यातुन पेन चार बटन दाबत असल्यामुळे दहा कीलोच्या मागे एक किलो धान घट होत होते .समजा अंशी किलोची भरती झाली तर ८ किलो धान पेन च्या सहाय्याने कमी होत असल्याचा प्रकार आढळून आला.
ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली त्याच शेतकऱ्यांनी त्या व्यापारी कडून पेन हीसकून पेनाची पाहणी केली असता पेनाच्या अंदर सेन्सर आढळून आले असता शेतकऱ्यांनी जेव्हा वजन काट्यावर धानाचे बोरे मांडले असता तेव्हा ९० किलो ची भरती आली आणि पेन चा बटन दाबले असता ८१ किलो भरती आली त्यामुळे व्यापारी ८ ते ९ किलो अधिकचे एका बोरयावर धान लुटण्याचा प्रयत्न करीत होता . अखेर शेतकऱ्यांनी धानाचा काटा बंद करून ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली होती त्या सुध्दा शेतकऱ्यांनी व्यापारी कडून अगोदर विक्री केलेल्या बोरया मागे पाच कीलो धान वाढवून देण्याची कबुली व्यापारी नी दिली आहे.
ज्या ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी नगदी पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही असा पवित्र घेतल्याने व्यापारी कडून सायंकाळ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले त्यामुळे शेतकरी शांत झाले.आता शेतकऱ्यांनी खाजगी व्यापारी कडून सावधान होण्याची गरज आहे. आजपर्यत प्रकार समोर आला नसल्यामुळे मैजिक पेन च्या सहाय्याने शेतकऱ्यांची खाजगी व्यापारी नी लाखो रुपये लुटमार केली आहे. जिल्ह्यातच असा प्रकार सुरू असेल पण तो कोणाच्या लक्षात आले नसल्यामुळे आजपर्यंत खाजगी व्यापारीनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लुटमार केली आहे तर अशा खाजगी व्यापारी वर प्रशासन लक्ष देईल. यामध्ये मात्र सदर व्यापारी याच्या विषयी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली नाही हे विशेष तसेच सालई खुर्द येथे अनेक व्यापारी असाच प्रकार चा गोरखधंदा करून शेतकऱ्यांचि लुट करित आहेत.









