साकोली तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा
दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- सततच्या अवकाळी पावसामुळे साकोली तालुक्यातील धानपिक पूर्णतः नष्ट झाले. शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. साकोली तालुक्यात “ओला दुष्काळ’ घोषित करून नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सडलेल्या धानाचे आणि किटग्रस्त पिकांसाठी सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, प्रति हेक्टरी ५० हजार रुपये शासकीय मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी असे मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तहसीलदार साकोली यांनानिवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक कापगते, जेष्ठ नेते मधुकर लिचडे, शहराध्यक्ष मासुरकर, किसान सेलचे अध्यक्ष डॉ. अजय तुमसरे, मार्कंड भेंडारकर, विजय दुबे, एच. बी. भेंडारकर, पुष्पा कापगते, कृष्णा हुकरे, सुचिता आगाशे, दिलीप निनावे, तेजस कापगते, हेमकृष्ण समरीत, दीपाली बोरकर, विजय साखरे, सुनंदा वलथरे, रवींद्र पंचभाई, कुलदीप नंदेश्वर, राकेश लिचडे तसेच पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करून पाहणी करण्यात यावी; तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे; आणि रब्बी हंगामासाठी कृषी मानसिक आधार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.









