गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी थेट शेतात जाऊन केली अवकाळी मुळे धानाच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी रविवार २ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हातील संपूर्ण आठ ही तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या धानाच्या शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. सडक अजर्ुनी तालुक्यातील ग्राम सावंगी येथील शेतात जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाले असून, त्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सोबत या पाहणी दौऱ्याचवेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हापरिषदचे पदाधिकारी, तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी, सडक अजर्ुनी नगरपंचायतचे व ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी बाधित क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीचा शेतावर जाऊन प्रत्यक्ष आढावा घेतला.
गोंदिया जिल्ह्यात शनिवार २५ ऑक्टोबर, २६ ऑक्टोबर आणि ३० ऑक्टोबर रोजी अवकाळी पावसाने कापणीला आलेल्या धान (भात) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक हिरावले गेल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पालकमंत्री नाईक यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत लवकर मिळू शकेल. नुकसानीचा सविस्तर अहवाल आल्यानंतर त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. परतीच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे पूर्णत: तर काहींचे अंशतः नुकसान झाले आहे. पुढील काळात जनावरांना चारा सुधा नाही. शेतात पुन्हा उभे असलेल्या धानाचे पण काही खरे नाही कारण..पाऊस अजून गेला नाही. राज्यात जून व सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी व पूर बाधितांसाठी विशेष शासन परिपत्रक काढण्यात आला व मदतनिधी घोषित करण्यात आली. तोच शासन परिपत्रक गोंदिया जिल्ह्याला ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीला लागू करणार आहात का?
संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आहे की आपली नुकसान झाली परंतु आपण जर तलाठ्याकडून नुकसानीचे सर्वे केलं आणि शासनाकडून तुटपुंजी जरी मदत मिळाली तर आपल्याला पुढे धानाचे मिळणारे बोनस मिळणार नाही याबद्दल आपण शेतकऱ्यांना विश्वस्त करणार का ? ९ ऑक्टोंबर २०२५ ला निघालेल्या शासन निर्णयाचा आधार घेऊन गोंदिया भंडारा जिल्ह्यात झालेल्या पिकांनी मदत करणार की नव्याने ऑक्टोंबर महिन्यात आलेल्या नुकसानीच्या आकड्यावर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही विशेष पॅकेज जाहीर करणार आहात हे स्पष्ट करावे. असे अनेक प्रश्न या निमित्ताने बाधित शेतकरी वर्गाकडून पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना विचारण्यात आले. आपण प्रत्यक्ष पाहणे उपस्थित झालेले प्रश्न आणि शेतकरी वर्गाकडून विचारण्यात आले प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही पालकमंत्री यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना दिली.







