विकासात अडथळा आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; भाऊबीज मेळाव्यात आ. नरेंद्र भोंडेकर यांचे आवाहन


भंडारा : भंडाऱ्यात विकास कार्य होत असतांना विकास विरोधकांनी हस्तक्षेप केला, ज्यामुळे होत असलेली कामे थांबली आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की राजकारणात तुम्ही काय केले याचा हिशोब सर्वांनाच द्यावा लागतो. राजकारण करीत होत असलेल्या विकासाचा विरोध करणे ही संकुचित मानसिकता आहे. म्हणून आपल्या भंडाऱ्याच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आवाहन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले. ते येथील मुस्लिम लायब्ररी सभागृहे आयोजित दिवाळी मिलन व भाऊबील समारंभास अध्यक्ष पदावरून संबोधित करित होते.

या वेळी मंचावर राज्यमंत्री आशीष जायस्वाल, पेस रुग्णालयाच्या संचालिका अश्विनीताई भोंडेकर, बिडिसीसी बँकेच्या संचालिका आशा गायधने, महिला तालुका प्रमुख विद्या मेहर, नलिनी काळे, महिला शहर प्रमुख आशा गिरीपुंजे, वैशाली खराबे, पूजा कुंभलकर, लक्ष्मी भागवत, शिव सेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, जिल्हा उप प्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख राजेश चोपकर, मागास वर्गीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक गजभीये, माजी नगर सेवक बाबू बागडे, मकसुद बंसी, वीक्की रावलाणी उपस्थित होते.
 दिवाळी सणाचे औचित्य साधत प्रती वर्षा प्रमाणे या वर्षी सुद्धा भंडारा शहर शिवसेना तर्फे दिवाळी मिलन आणि भाऊबीज समरोहाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून म्हणून राज्य मंत्री आशीष जायस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र समोर दीप प्रज्वलित करून क अरण्यात आली.

उद्घाटक म्हणून कार्यक्रमाल संबोधित करतांना राज्यमंत्री जायस्वाल म्हणाले की, आम. भोंडेकर यांच्या द्वारे भंडारा विधान सभेत केले जात असलेले विकासकामांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात ऐकायला मिळते आणि हे विकास निरंतर सुरू ठेवायचे असेल तर नगर परिषद निवडणुकीत सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे रहा. म्हणजे भंडाऱ्याची प्रचिती राज्यातच नाही तर संपूर्ण देशातही ऐकायला मिळेल.

या वेळी प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित डॉ अश्विनताई भोंडेकर म्हणाल्या की, त्या डॉक्टर म्हणून समाज सेवेत आहेत. परंतु आमदार साहेबांची पत्नी म्हणून त्यांच्या सोबत राहून कामे केली आहे. भविष्यात पक्ष श्रेष्ठी जर काही जबाबदारी देतील तर त्या ती जबाबदारी घेण्यास तयार आहेत. आणि यात भंडाराचे बंधु भगिनी त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील हा त्यांना पक्का विश्वास आहे.
आम. भोंडेकर यांनी कार्यक्रमास संबोधित करतांना म्हणाले की, भंडाऱ्याचे विकास हे माझ्या करीता प्राथमिक राहिले आहे. ज्यामुळे आज पर्यन्त कोणताही नेता जे करू शकला नाही ती कामे भंडाऱ्यात होत आहेत. कारण ही लढाई आता शिवसेनेची नसून विकासाची आहे. नेता म्हंटले की हक्काचा माणूस असणे गरजेचे आहे. आज भंडाऱ्यात होत असलेल्या विकास कामांची दखल गूगलच नाही तर एआई ने सुद्धा घेतल्या मुले येथील कामे जगाच्या पाठीवर गाजत आहे. भंदऱ्यात 215 कोटींचे रास्तेच नाही तर नझुल चे 16400 घरांचे पट्टे हटणे हो मोठी बाब आहे. आज पर्यन्त फ्री वाईफाई, स्मशान घाटात निशुल्क लाकडे, नगर परिषदेचे 11 शाळा पूर्ववत सुरू करणे, त्याच शाळेत इंग्रजी माध्यमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, उर्दू शाळा करीत 3.40 कोटी चा निधी, ई लायब्ररी, हुतात्मा स्मारक, ज्येष्ठ नागरिक योजना, महिला ग्राम संघ सारखी अनेक कामे भंडाऱ्यात करीत आहे. या शिवाय जलपर्यटन ही भंडारा येथील युवकांना रोजगरचे मोठे साधन होणार आहे. परंतु बाहेरून आलेल्या काही नेत्यांच्या डोळ्यात भंडाऱ्याचा विकास खुपट आहे आणि ते वाट्टेल त्या मार्गाने अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की राजकारणात कुणी काय केले याचा हिशोब जनतेसमोर ठेवावा लागतो. विकासात अडथडा घालणे म्हणजे संकुचित मानसिकते सोबत महापाप सुद्धा आहे. म्हणून या विकास विरोधी आणि समाज विरोधी काम करणाऱ्यांना आता धडा शिकवायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *