खडकी ते मांडवी रस्ता बनला अपघाताचा केंद्रबिंदू

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी रस्त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. परंतु एक वर्ष लोटला असतांनाही रस्त्याचे काम धिम्मगतीने होत असल्याने खडकी ते मांडवी रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे. मोहाडी व भंडारा तालुक्याला जोडणारा खडकी ते मांडवी रस्ताच्या सिमेंटीकरणासाठी निधी मंजूर झाला. गोंदिया जिल्ह्यातील बछवानी यांना हा कंत्राट झाला आहे.

एक वर्षापूर्वी कंत्राट झाले. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. काही महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली. मात्र मधात मधात १०० मिटर रस्त्यावर सिमेंटीकरण करून तीन ते चार महिन्यापासून काम बंद पडले आहे. तिनशे मिटर रस्त्याच्या कामाला एक वर्ष लागला तर पाच किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी पाच वर्षे लागतील का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. रस्त्यावर पुर्णतः खड्डे पडल्यामुळे साधी सायकल सुध्दा चालवू शकत नाही तर टू व्हीलर व मोठी वाहन कसेकाय चालणार? एवढी रस्त्याची बिकट परिस्थिती असतांना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले आहे.

या अगोदर कित्येकदा रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. फक्त अधिकारी आश्वासन देवून आंदोलन सोडण्याचे काम करतात. पण रस्त्याचे कामाकडे दिरंगाई करीत असतात त्यामुळे चार वर्षे होत असून अजुनही खडकी ते मांडवी रस्ता पुर्ण करण्यात आला नसल्यामुळे परीसरातील नागरीकांना मोठा त्रास होतो आहे. भंडारा जिल्ह्याचा ठिकाण असल्यामुळे करडी ते पालोरा परीसरातील नागरीकांना प्रत्येक कामा करीता भंडारा जावे लागतो. या परीसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भंडारा येथे शिक्षण घेत आहेत, कर्मचारी सुध्दा येणे जाणे करीत असतात त्यामुळे नेहमी या रस्त्यावरून रहदारी सुरू असते. र

स्ता पुर्णतः उखडलेला असल्यामुळे नागरीकांना रहदारी कसं करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे? एखाद्याची प्रकृती खालावली किंवा एखाद्या महीलेला प्रसृती करीता भंडारा येथे घेवून जातो म्हणाले तर या रस्त्यामुळे दगाऊ शकतो हे पक्क आहे. या रस्त्यावर आतापर्यंत कित्येक अपघातात गंभीर जखमी किंवा कीरकोळ जखमी झालेले असून काही मृत्यू पावले आहेत याची शासकीय रुग्णालय भंडारा येथे नोंद आहे. खडकी ते मांडवी रस्ता शासना कडून मंजूर करण्यात आला व निधी पण मंजूर करण्यात आली आहे पण प्रशासन याकडे लक्ष देत नाही. विस दिवसा अगोदर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी करडी येथे आले होते परंतु ते भिलेवाडा ते खडकी मार्ग आले नसून ते दाबा ते मुंढरी मार्ग आलेत समजा भिलेवाडा मार्ग आले असते तर नितीन गडकरी साहेबांना कळलं असतं या रस्त्याची काय हालत आहे म्हणून पण प्रशासनाने त्या मार्गाने न येवू देता रोहा मार्ग आणले त्यामुळे गडकरी साहेबांना याची कल्पना नाही आहे.

कोणताही मंत्री येत असतांना प्रशासन चांगल्या रस्त्याने मार्ग काढत असतो कारण की प्रशासनाला त्याची लाज वाटत असतो. असा प्रकार प्रशासन कडून केला जात असल्यामुळे खडकी ते मांडवी रस्ता कडे कोणी लक्ष देत नाही. भंडारा जिल्ह्याचे खास. प्रशांत पडोळे आहेत परंतु सत्येत नाही त्यामुळे त्याचा प्रभाव कमी आहे परंतु भंडारा विधानसभा श्रेत्राचे आम. नरेंद्र भोंडेकर व तुमसर मोहाडी विधानसभा श्रेत्राचे आम. राजु भाऊ कारेमोरे सत्तेत आहेत व विधानसभा परीषदचे आम. आ. परीणय फुके हे सध्या मुख्यमंत्री जवळचे असतांनाही खडकी ते मांडवी रस्त्याचे कामाला लक्ष दिले जात नाही त्यामुळे कुठं तरी प्रशासनाकडून मुठमाती देण्याचा काम केला जात आहे म्हणून खडकी ते मांडवी रस्ता अडून बसला आहे. त्यामुळे एखाद्या नेता समोर येवून खडकी ते मांडवी रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी लक्ष देईल काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *